Maharashtra Din : ‘देशाचं पावर हाऊस असलेला महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आहे’; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी काढलो गौरवोद्गार

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथील राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
Maharashtra Din : ‘देशाचं पावर हाऊस असलेला महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आहे’; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी काढलो गौरवोद्गार

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथील राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. आज, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडत आहेत. त्याची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी येथे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजास वंदन करून केली. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : Maharashtra Din History: मोरारजी देसाईंचा ‘तो’ आदेश अन् 106 जणांची प्राणांची आहुती; महाराष्ट्र दिनानिमित्त वाचायलाच हवी अशी संघर्षाची गाथा

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version