MLA Aaditya Thackeray : ‘शिवसेना एकच…ती आमची…बाकी भाजपचे गुलाम!’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह महायुतीवर घणाघात

MLA Aaditya Thackeray : ‘शिवसेना एकच…ती आमची…बाकी भाजपचे गुलाम!’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह महायुतीवर घणाघात

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यात सुरू असलेल्या खासदार फुटीवर त्यांनी भाष्य केले. ठाकरेंचे सहा खासदार शिवसेनेत गेल्याबद्दल आदित्य यांना विचारण्यात आले. त्यावेळी, शिवसेना एकच, ती आमची, बाकी भाजपचे गुलाम आहेत, अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली. सरकारने लाडकी बहीण योजनेतून 85 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढलं आहे. सरकारकडे बेस्टला द्यायला पैस नाहीत, खासदार विकत घ्यायला मात्र पैसे आहेत, असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, नालायक लोक गेले, त्यांना जनता दाखवून देईल, यांना निवडणून देणाऱ्या जनतेने भाजप विरोधात मतदान केलं होतं, असेही आदित्य यांनी म्हटले. 

हेही वाचा : Girish Mahajan On Narendra Darade : “ओठात काही पोटात काही, 40 वर्षांच्या राजकारणात…” दराडेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

आपल्या पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांबाबत बोलताना शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “ते बंडखोर नाहीत, तर ‘डरपोक आणि बिकाऊ’ आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमव्हीए (MVA) यांच्या नावावर, भाजपच्या विरोधात निवडून आले होते. आता भाजपला त्यांना आपल्या ‘दलदलीत’ ओढायचे आहे, जेणेकरून लोकसभेत दोन-तृतीयंश बहुमत मिळवून देशाची राज्यघटना बदलता येईल. ज्या प्रकारे आमच्या पक्षात फूट पाडली गेली, त्याच प्रकारे टीएमसी (TMC) आणि आप (AAP) मध्येही फूट पाडली गेली. जर या देशात कायदा आणि राज्यघटना अस्तित्वात असेल, तर आपण न्यायाची अपेक्षा करू शकतो.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version