राष्ट्रवादीच्या रुपाली आमनेसामने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्या वाढत्या महात्वाकांक्षेतून वाद होण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादीच्या रुपाली आमनेसामने

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्या वाढत्या महात्वाकांक्षेतून वाद होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यपालांच्या शिफारशीद्वारे विधान परिषदेत लवकरच बारा सदस्यांची नियुक्ती होणार आहेत. महायुतीच्या सूत्रानुसार भाजपा सहा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी तीन जागा लढवण्याची तयारी करत आहे. राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर यांनाच संधी मिळेल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरेंनी नाराजी जाहीर केली आहे. 

एकाच व्यक्तीला किती महत्त्वाची पदं देणार ? विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या इतर सक्षम उमेदवारांचाही विचार व्हायला हवा, असे सांगत रुपाली ठोंबरे यांनी त्या पण विधान परिषदेची निवडणूक लढवू इच्छितात असे सांगितले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version