Ashok Kharat Case: सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकर यांच्याकडून धोका?; बीडमधील ‘त्या’ फोन कॉलने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
Ashok Kharat Case: सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकर यांच्याकडून धोका?; बीडमधील ‘त्या’ फोन कॉलने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आधीच तापलेले असताना आता या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्याने, राज्याच्या राजकारणात या घडामोडींनी खळबळ उडवली होती.

खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवत, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकरांकडून धोका असल्याचा दावा केल्याचे वृत्त आहे.

एसआयटीकडे या प्रकरणात विविध माध्यमांतून तक्रारी, फोन कॉल आणि संदेश येत असून, त्याचाच भाग म्हणून ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र, ही तक्रार तथ्याधारित आहे की केवळ खोडसाळपणातून करण्यात आली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली आहे. 

हेही वाचा: Petrol Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा मोठी उलथापालथ?; पाहा आजचे दर काय आहेत

या पार्श्वभूमीवर एसआयटीने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, पोलिसांकडून या तक्रारीची पडताळणी सुरू आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी माहिती गोळा करत असून, सत्य काय आहे हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धागेदोरे समोर येत असून, तपासाचा फास अधिक घट्ट होत चालल्याचे चित्र आहे. या प्रकरणातील सर्व तथ्य समोर आल्यानंतर खरातसह दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Ashok Kharat Case: ‘माझं मरण इथेच…’; भोंदू बाबाच्या पापाचा घडा भरला, चौकशीत उत्तरं देताना अक्षरश: नाकीनऊ

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version