उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. या तपासादरम्यान आधी मुंबई पोलिस दलातील माजी एपीआय सचिन वाझे याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर पुढील तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा नागपुरात दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.
मनसुख हिरेन आणि स्फोटकं प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला राजहतरीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून प्रदीप शर्माच्या घरावर छापेमारी सुरू होती.
मनसुख हिरेन प्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा आरोप प्रदीप शर्मावर करण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा २८ जूनपर्यंत एनआयए कोठडीमध्ये असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.