पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी राशपमध्ये गेले आहेत. या पक्षांतरानंतर मविआत धूसफूस सुरू झाली आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा १८ जुलैचा भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनता दरबार अचानक रद्द झाला आहे. याआधी खासदार अमोल कोल्हे यांचे जुन्नर,आंबेगाव, हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनता दरबार व्यवस्थित झाले होते. पण भोसरीतला जनता दरबार अचानक रद्द झाला. यामुळे पक्षांतरावरुन धूसफूस सुरू झाल्याची चर्चा भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे.
कोल्हे पुन्हा खासदार झाल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिउबाठात अनेक पदाधिकारी उत्सुक आहेत. पण राष्ट्रवादीतून राशपमध्ये झालेल्या पक्षांतरामुळे अनेकजण नाराज आहेत. राष्ट्रवादीतून राशपमध्ये झालेल्या पक्षांतरावरुन मविआत अंतर्गत धूसफूस वाढू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.