Ritu Tawde Controversy : मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नेमकं चाललंय काय? घड्याळ प्रकरणानंतर आता लाल दिव्याची गाडी; मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्वीटने मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Ritu Tawde Controversy : मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?  घड्याळ प्रकरणानंतर आता लाल दिव्याची गाडी; मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्वीटने मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आधी घड्याळ,मग बदल्यांचं प्रकरण आता लाल दिव्याच्या गाडीवरून मुंबईच्या महापौर रितू तावडे चर्चेत आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी नुकतचं एक ट्वीट शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या विरोधातील दोन बातम्यांची कात्रणे जोडली आहेत. यावेळी नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांवर थेट सवाल उपस्थित केला आहे. 2017 मध्ये केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती.

हेही वाचा- Murlidhar Mohol: “29 वर्षांपूर्वी…” मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल; एक महिना सक्तीची विश्रांती

मात्र तरी देखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ गाडीवर पोलिस वाहनांसारखे लाल-निळे दिवे लावलेले आहेत. तसेच त्यांच्या नव्या इनोव्हा गाडीवर दिवे नसले तरी फ्रंट ग्रिलजवळ लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. महापौरांच्या गाडीवरील हे दिवे आणि नामफलक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच भाजपच्या सत्तेत आल्यानंतर या नियमाला बगल दिल्याची टीका होत आहे. याचसंदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत, ‘नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?’ असं म्हटलं आहे, तसेच सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतही महापौरांच्या गाडीवरून लाल दिवा काढण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा यावरुन वाद सुरु झाला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version