Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळे यांना फटका

महाराष्ट्र दिन आणि सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत. मात्र महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.
Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळे यांना फटका

महाराष्ट्र दिन आणि सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत. मात्र महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. कामत हॉटेल ते वाकण फाटा इथंपर्यंत वाहनाच्या रांगा पोहोचल्या आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घाट विभाग आणि टोल नाक्यांजवळ वाहनांचा वेग अत्यंत मंदावला असून प्रवाशांना तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे.

शिवाय बेशिस्त वाहन चालकांचा फटका वाहतुकीला बसतो आहे. कोकणात जाणाऱ्या लेन वर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते आहे वाहने अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांना पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. आज ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

यामुळे इतर ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेकडे तुलनेने दुर्लक्ष झाल्याची भावना वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. वाहनचालकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी पोलिसांचा मोठा फौजफाटा उद्घाटनस्थळी वळवण्यात आल्याने कोंडी सोडवण्यात अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version