Maharashtra Political Crisis : ‘महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू’; शरद पवार गटातील खासदाराच्या विधानाने खळबळ, ठाकरेंनंतर आता पवारांनाही धक्कातंत्र?

Maharashtra Political Crisis : ‘महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू’; शरद पवार गटातील खासदाराच्या विधानाने खळबळ, ठाकरेंनंतर आता पवारांनाही धक्कातंत्र?

नाशिक : राज्याच्या राजकारणात दररोज महत्त्वाच्या घडामोडी घडत असून आमदार, खासदारांच्या बंडखोरीची उदाहरणही सर्रास पाहायला मिळत आहेत. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर हेदेखील महायुतीत सामील झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून मोठी बातमी येत आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीकडून ऑफर आल्यास संदर्भात विचार करू, असे खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे ठाकरेंनंतर महायुती आता पवारांनाही धक्का देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

नेमकं प्रकरण काय ?

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाशिक येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य केले. महायुतीकडून ऑफर आल्यास संदर्भात विचार करू, असे त्यांनी सांगितल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, पक्षांतराचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नसून विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार मार्गी लागत असेल आणि त्यासाठी महायुतीकडून कोणती ऑफर आली, तर त्याचा विचार केला जाईल. मात्र, त्यांनी "जाणार" असे कुठेही म्हटले नसून, विकासाला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. 

हेही वाचा : राजकारणात मोठी उलथापालथ! सरकार पाडण्याचा कट उधळला, आमदारांना प्रत्येकी 50 कोटी; नेमकं काय घडलंय?

"पवारसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण" हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीच्या चर्चांवर बोलताना कोल्हे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांनी 2019 साली लोकसभा निवडणूक जिंकून खासदारकी मिळवली. त्यानंतर 2024 च्या लोकसभेतही विजयी होऊन खासदारकी कायम ठेवली. शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्यांपैकी अशी त्यांनी ओळख आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या पक्षातराची बाब ही राज्याच्या राजकारणातील मोठी घटना मानली जाईल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version