नाट्यगृह कर्मचाऱ्यावर आमदार गीता जैन भडकल्या

नाट्यगृह कर्मचाऱ्यावर आमदार गीता जैन भडकल्या

मीरा-भाईंदर, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: आमदार गीता जैन यांचा पालिका अधिकाऱ्याला कानशिलात लगावण्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान झाला होता.त्याच बरोबर रविवारी लता मंगेशकर नाट्यगृहातील पालिका अधिकाऱ्याला ओरडण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या सर्व प्रकरणात आता मनसेने प्रवेश मारला आहे.मनसे मीरा भाईंदर विधानसभा प्रमुख संदीप राणे यांनी आमदार गीता जैन यांना माफी मागण्याचे आव्हान केले आहे.

रविवारी मीरा रोडमधील लता मंगेशकर नाट्यगृहात मराठी व राजस्थानी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. दिलेल्या वेळा अनुसार सायंकाळी ५ च्या सुमारास मराठी नाटक हे संपणार होते, मात्र नाट्यरसिकांच्या फार्महीश वरून नाटकाला वन्स मोरचा आवाज आला. त्यामुळे सायंकाळी ५ ऐवजी नाटक ५.३० संपले. त्यामुळे आमदार गीता जैन या आयोजकांवर भडकल्या व पालिका उपयुक्त कल्पिता पिंपळे यांना संपर्क साधून मराठी नाटक ५ वाजता बंड करण्याचा आदेश दिला अन्यथा मराठी नाटक बंद करू असे त्यांना खडसावले. या सर्व प्रकारावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गीता जैन ह्या सर्व धर्मिय आमदार आहेत.मीरा भाईंदर मधिल सर्व धर्मातील लोकांनी त्यांना निवडून दिले आहेत. अशाप्रकारे मराठी माणसांचा अपमान सहन केला जाणार नाही असा मनसेने इशारा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version