मुंबईकरांना परवडणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयाचे नाव आता बलण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालयाच नाव बदलण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढांनी पालिकेला पत्र लिहलं आहे. केईएम रुग्णालय हे मुंबईचे प्रसिद्ध आणि गोरगरिबांसाठी परवडणारे महापालिकेचे रुग्णालय आहे. तसेच केईएम रुग्णालय मुंबईची ओळख देखील आहे. यापूर्वी देखील मंत्री मंगल प्रभात लोढांनी या रुग्णालयाचे नाव बलण्याची मागणी केली होती. त्यावेळेस राजकीय स्तरावर आणि आरोग्य क्षेत्रातून मोठी टीका झाली होती.
त्यानंतर लोढांनी पालिकेला पाठवलेल्या या पत्रानंतर मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयाच्या नामांतराची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. यावेळी के.ई.एम. रुग्णालयाचे नाव "कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय" कराव अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रातून पालिकेकडे केली आहे. जानेवारी 2026 मध्ये के.ई.एम. रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात लोढा यांनी ही मागणी केली होती. ब्रिटिशांच्या काळातील हे नाव असल्याने ते बदलण्याची शिफारस करणारी के.ई.एम. रुग्णालयाच्या नामांतराची मागणी लोढा यांनी दुसऱ्यांदा करण्यात आली आहे. या आधीही लोढा यांनी नाव बदलावे अशी मागणी केली असताना वाद झाला होता. त्यामुळे आता पुन्हा केलेल्या या नामांतराच्या मागणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
हेही वाचा- Nashik Water Shortage : नाशिककरांनो लक्ष द्या! जलसंपदा विभागाचा महापालिकेला अलर्ट; आता आठवड्यातून 1 दिवस पाणी…
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रात म्हटले की, "'स्वदेशी' या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृद्ध स्वदेशी वारसा पुर्नप्रस्थापित आणि गौरवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सार्वजनिक संस्थांची नावे पुनर्विचारात घेणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. अजूनही अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावे वापरतात, जी दास्याच्या काळाची आठवण करून देतात. या नावांची जागा आपल्या स्वतःच्या संस्कृती, मूल्यांना आणि प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे. या संदर्भात, किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देईल.
मी खालील पर्याय आपल्या विचारासाठी सुचवित आहेः
१. कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय (Kaushalyashreshtha Eklavya Memorial Hospital) (KEM Hospital)
उपरोक्त नाव आपल्या समाजासाठी सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैतिक महत्त्व घेऊन येते. या प्रतिष्ठित संस्थेचे नामकरण भारतीय महापुरुषाच्या नावावर केल्याने आपल्या वारशाचा गौरव होईल तसेच नागरिकांमध्ये अभिमान आणि जोडलेपणाची भावना देखील दृढ होईल. सबब, हा प्रस्ताव विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा."
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.