OMG! तरुणाने दातांनी ओढली 279 टन वजनाची ट्रेन; गिनीज वर्ल्ड बुकने शेअर केला व्हिडिओ

अशरफ मोहम्मद सुलेमान यांनी 279 टन वजनाची ट्रेन दातांनी ओढून हा विक्रम केला आहे. 'दातांनी सर्वात जड ट्रेन ओढणे' या श्रेणीत हा विक्रम गिनीज बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
OMG! तरुणाने दातांनी ओढली 279 टन वजनाची ट्रेन; गिनीज वर्ल्ड बुकने शेअर केला व्हिडिओ
Instagram

Man Pulls Train With Teeth: असं म्हणतात की जर माणसाकडे इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. जर कोणी हे मनात ठरवलं तर तो ते काम पूर्ण करू शकतो. त्याचप्रमाणे, इजिप्तमधील रहिवासी अशरफ मोहम्मद सुलेमान यांनी हे खरे असल्याचे सिद्ध केले आहे. त्याने 279 टन वजनाची ट्रेन दातांनी ओढून जगाला आश्चर्यचकित केले असून या अनोख्या पराक्रमाने त्याने आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.

दातांनी ओढली सर्वात जड ट्रेन – 

अशरफ मोहम्मद सुलेमान यांनी 279 टन वजनाची ट्रेन दातांनी ओढून हा विक्रम केला आहे. यादरम्यान, त्याने दातांनी दोरी धरली आणि काही मीटर ट्रेन ओढली आणि जगासमोर आपली ताकद सिद्ध केली. ‘दातांनी सर्वात जड ट्रेन ओढणे’ या श्रेणीत हा विक्रम गिनीज बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गिनीजचे अधिकारी आणि शेकडो प्रेक्षक उपस्थित होते, ज्यांनी हे अशक्य वाटणारे पराक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. हा व्हिडिओ @guinnessworldrecords ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. तसेच हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 

हेही वाचा – माकडा माकडा हुप.. वाघाला बसवलं चूप! पाहा माकडाची शिकार करायला गेलेल्या वाघाची फजिती, पाहा VIDEO

या विक्रमामागे अशरफची वर्षानुवर्षे केलेली मेहनत आणि कठोर प्रशिक्षण होते. त्याने त्याच्या शरीराला, विशेषतः जबड्याच्या आणि मानेच्या स्नायूंना, इतके जड वजन सहन करण्यास प्रशिक्षित केले. शिवाय, त्याच्या मानसिक कणखरपणा आणि आत्मविश्वासामुळे हा पराक्रम शक्य झाला. अशरफ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हे केवळ शारीरिक ताकदीचेच नाही तर मानसिक ताकदीचाही परिणाम आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version