Devendra Fadnavis criticized Mallikarjun Kharge : "खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाला" खरगेंचं पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान, फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता फडणवीस यांनी देखील खरगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Devendra Fadnavis criticized Mallikarjun Kharge : "खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाला" खरगेंचं पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान, फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेन्नईमध्ये आयोजित एका जाहीर भाषणात बोलताना ‘दहशतवादी’ असा उल्लेख केला. खरगेंनी केलेल्या या विधानामुळे देशाच्या लोकशाहीचा अपमान झाला असल्याची भावना भाजपने व्यक्त केली आहे.

हेही वाचा- Mallikarjun Kharge Controversial Statement : पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख, मल्लिकार्जुन खरगेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खरगेंवर जोरदार हल्लाबोल करत म्हटलं की, “सततच्या पराभवाने मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाला असावा… ज्यांनी सुरक्षित भारत तयार केला त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले… मौत का सौदागर म्हणून मोदीजींना बोलले होते… देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलले त्याबद्दल निषेद्ध करतो… त्यांनी जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी करतो… काँग्रेसला आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे हताश होऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे अशा प्रकारची पंतप्रधानांविषयी वक्तव्ये करत आहेत… परंतु ते जेव्हा -जेव्हा मोदींवर हल्ला करतात त्या-त्या वेळी जनता त्यांना उत्तर देते आणि त्या-त्या वेळी जनता त्यांना पराभूत करते. याआधी काँग्रेसने पंतप्रधानांना ‘मौत का सौदागर’ असे म्हटले होते आणि आता ‘दहशतवादी’ म्हणत आहेत… मी मल्लिकार्जुन खडगे यांना सांगतो की त्यांनी सार्वजनिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी.” 

मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात केवळ पंतप्रधानांवर टीका केली नाही, तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विचारधारेवरही ताशेरे ओढले. “जे लोक समसमानता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाहीत, ते देशाला काय दिशा देणार?” असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला होता. मात्र, टीकेच्या ओघात त्यांनी वापरलेल्या ‘टेररिस्ट’ या शब्दामुळे मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटले असून आता हे प्रकरण केवळ कायदेशीर लढाईपुरते मर्यादित न राहता प्रतिष्ठेचे बनले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर या वादाचे भवितव्य अवलंबून आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version