Maharashtra MLC Election : फॉर्म्युला ठरला! विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा जागावाटपासाठी मेगा प्लॅन; वाचा कोणाला किती जागा

Maharashtra MLC Election : फॉर्म्युला ठरला! विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा जागावाटपासाठी मेगा प्लॅन; वाचा कोणाला किती जागा

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणून महायुती एकत्रित लढणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या जागांवर या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला असून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला किती जागा मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले असून महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्याकडून याला दुजोरा मिळाला आहे. विधान परिषदेच्या तब्बल 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 

हेही वाचा : Dattatray Bharne: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'या' तारखेपूर्वी होणार 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी; कृषिमंत्र्यांची थेट घोषणा

भाजपचे अनेक ठिकाणी बहुमत असल्याने 16 पैकी 14 ते 15 जागांवर भाजप उमेदवार देण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजप 12 जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना शिंदे गटाला 3 जागा तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमधील जागांचा तिढा सोडवण्यासाठी काही मतदारसंघांमध्ये पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाण्याची दाट शक्यता आहे. घटक पक्षांमधील समन्वय साधण्यासाठी आणि विजयाची खात्री निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. या जागावाटपाबाबत तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, याच आठवड्यात जागावाटपाची अधिकृत आणि अंतिम घोषणा केली जाईल, अशी माहितीदेखील समोर येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version