Pune Accident News : भीषण अपघात! अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर एसटीची दुचाकीला धडक; चार जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pune Accident News : भीषण अपघात! अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर एसटीची दुचाकीला धडक; चार जणांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील डिंगोरे परिसरात एक भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन चारजण कामावरून घरी परत जात होते. दरम्यान याचवेळी कल्याणवरुन आळेफाट्याकडे निघालेल्या एसटी बसची आणि त्या दुचाकीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्या दुचाकीवरील चौघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी कोणताही वेळ वाया न घालवता मदतीसाठी धाव घेतली. शिवाय अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन अपघातास्थळी दाखल झाले. चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. मृत व्यक्ती हे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नेहमीप्रमाणे कामावरुन परत येत असताना अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा : Accident News : नेमकं चाललंय काय? आणखी एक अपघात अन् पुन्हा 8 जण दगावले; नदीत शिंपले गोळा करणं ठरलं घातक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version