Varsha Gaikwad on CM Devednra Fadanvis: मुख्यमंत्री बुलेटवरून विधानभवनात आले त्या गाडीची पीयुसीच एक्सापायर; वर्षा गायकवाडांनी थेट साधला निशाणा, नेमकं काय म्हणाल्या?

मात्र आता विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.  आता मुख्यमंत्र्‍यांनी चालवलेल्या बुलेटची पीयुसीची देखील मुदत संपल्याचं काँग्रसने समोर आणलं आहे.
Varsha Gaikwad on CM Devednra Fadanvis: मुख्यमंत्री बुलेटवरून विधानभवनात आले त्या गाडीची पीयुसीच एक्सापायर; वर्षा गायकवाडांनी थेट साधला निशाणा, नेमकं काय म्हणाल्या?

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रात सध्या इंधन बचतीसाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मंत्र्यांनी कमीत कमी वाहनांचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. याची सुरूवात स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली आहे,  विधानभवनात येताना मुख्यमंत्री थेट बुलेटवरून येताना दिसले. या कृतीचे सर्वत्र कौतुक केले गेले. मात्र आता विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.  आता मुख्यमंत्र्‍यांनी चालवलेल्या बुलेटची पीयुसीची देखील मुदत संपल्याचं काँग्रसने समोर आणलं आहे.

कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जी बुलेट चालवली त्या गाडीचा फोटो शेअर करत पीयुसी संपली असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. 

वर्षा गायकवाड यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘Expired Maal’ चालतं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साधनेसाठी, स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे PUC मुदतबाह्य झालेलं होतं, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रेही शेअर केली आहेत. 

मुख्यमंत्री फडणवीस स्वतः ‘रॉयल एनफिल्ड 350’ ही बाईक चालवत विधान भवनात दाखल झाले. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मात्र, मुख्यमंत्र्‍यांच्या रॉयल एंट्रीवरुन आता राजकारण तापलं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version