मुंबई: गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. चला तर जाणून घेऊया आज कोणकोणत्या राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
वर्षा बंगल्यावर गणरायाचं आगमन, फडणवीसांच्या हस्ते महाआरती
वर्षा बंगल्यावर आज गणरायाचे आगमन झाले. यानिमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. बुधवारी दुपारी 12: 50 वाजता गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
अस्यैप्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा क्षरन्तु च।
अस्यै देवत्वमर्चार्यम मामेहती च कश्चन।। ? ?Blessed with Bappa’s Aagman at our official residence today. Like every year, welcomed Ganpati Bappa with devotion and performed Shri Ganesh Sthapna puja with family. Bappa’s divine… pic.twitter.com/Lu4O38PxiP — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 27, 2025
उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची भेट
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राजसाहेब ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सहकुटुंब राजसाहेब ठाकरे ह्यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. pic.twitter.com/8VNdHbuu59 — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 27, 2025
शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान
बुधवारी, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले असून, त्यांनी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली.
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं उत्साही वातावरणात आगमन
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावडा, कोल्हापूर येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचं उत्साही वातावरणात आगमन झाले. यादरम्यान, सतेज पाटील यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया !
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी घरी आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले. कुटुंबियांसोबत भक्तीभावाने गणपती बाप्पाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा आणि आरती केली. pic.twitter.com/s1TlqVfiRP — Satej (Bunty) D. Patil (@satejp) August 27, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.