Vidhabhavan Fake Pass: विधानभवनात घुसण्यासाठी लढवली अजब शक्कल; बनावट पास विकून केली हजारोंची वसुली, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असून, मरीन ड्राईव्ह पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Vidhabhavan Fake Pass: विधानभवनात घुसण्यासाठी लढवली अजब शक्कल; बनावट पास विकून केली हजारोंची वसुली, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट प्रवेश पास वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील सविस्तर माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये मंत्रालयातील काही कर्मचारी तसेच काही खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पासेससाठी हजारोंची वसुली

तपासात असेही समोर आले आहे की, प्रत्येक बनावट पाससाठी दोन ते अडीच हजार रुपये आकारले जात होते. विधानभवनात प्रवेश मिळवण्यासाठी काही जणांनी ही शक्कल लढवली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्या वेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळेच संशय निर्माण झाला आणि त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. तपासात हा बनावट पासचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: IAS Officer Transferred: प्रशासकीय खांदेपालट की ‘खरात’ प्रकरणाचा दणका? राज्य सरकारकडून बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

सात जणांवर गुन्हा; तपास सुरू

या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

मोठ्या साखळीचा संशय

या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटमध्ये कोणत्याही मंत्र्यांचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, विधानभवनासारख्या संवेदनशील ठिकाणी बनावट पासद्वारे प्रवेश मिळवण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. आगामी तपासात या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Ashok Kharat Case: भोंदू बाबाचं ‘हवाला’ कनेक्शन! अशोक खरातने परदेशात पाठवले कोट्यवधी रुपये? बड्या अधिकारी-नेत्यांचे धाबे दणाणले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version