‘सोमैयांचा सॉस लावून जखमी झाल्याचा दावा’ – संजय राऊत

‘सोमैयांचा सॉस लावून जखमी झाल्याचा दावा’ – संजय राऊत

भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर मुंबईत झालेल्या हल्ल्यामुळे त्यांनी काल केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमैयांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमैयांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमैया ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावला आहे. त्यामुळे सोमैया हा दावा करत असतील तर अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष  केले पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

यावेळी, संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, शरद पवारांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. सरकार येऊ शकलं नाही म्हणून जी अस्वस्थता निर्माण झाली आहे. ती फडणवीसांच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहे. त्यामुळे सत्ता न आल्यामळे निर्माण झालेली अस्वस्थता त्यांनी घरात बसून हनुमान चालीसा म्हणून शांत करावी, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेल्य हल्ल्याप्रकरणी सोमैयांसह भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी याप्रकरणी तपासासाठी विशेष संघ पाठवण्याची विनंती गृहसचिवांना केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version