Israel Air Strike in Gaza: इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला; 7 मुलांसह 70 नागरिकांचा मृत्यू

हमासने गाझासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 कलमी शांतता योजनेला स्वीकारल्यानंतर इस्रायली लष्कराने हल्ला हा हल्ला केला आहे.
Israel Air Strike in Gaza: इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला; 7 मुलांसह 70 नागरिकांचा मृत्यू

Israel Air Strike in Gaza: गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या ताज्या हवाई हल्ल्यात सात मुलांसह 70 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले मुले दोन महिन्यांपासून आठ वर्षांपर्यंत वयोगटात होती.  हमासने गाझासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 कलमी शांतता योजनेला स्वीकारल्यानंतर इस्रायली लष्कराने हल्ला हा हल्ला केला आहे.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत हमास सर्व अटी पूर्ण करीत नाही, तोपर्यंत गाझामधील लष्करी कारवाई सुरू राहणार आहे. हमासने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता योजनेला सहमती दर्शविली आहे. मात्र, शांतता योजनेची महत्त्वाची मागणी असलेले निःशस्त्रीकरण हमास स्वीकारेल की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा – North Korea : किम जोंगचा नवा फतवा; उत्तर कोरियात 'या' शस्त्रक्रियेवर बंदी; डॉक्टर आणि महिलांवर होणार कठोर कारवाई

अल जझीराच्या वृत्तानुसार, गाझा परत मिळवण्यासाठी इस्रायली सैन्य हल्ले करत आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे सुमारे 10 लाख लोक विस्थापित झाले आहेत, ज्यांना त्यांच्या घरे सोडून दक्षिण गाझामध्ये स्थलांतर करावे लागले. तुफाह भागात झालेल्या हल्ल्यात अठरा नागरिक मारले केले. तर दक्षिण गाझातील अल-मावासी विस्थापन छावणीवर झालेल्या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच मानवी हक्क संघटनांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा – Air India Emergency Landing: मोठा अपघात टळला! टर्बाइन बंद पडल्याने एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनरचे ब्रिटनमध्ये इमर्जन्सी लँडिंग

शांतता प्रक्रियेसाठी इस्रायलने इजिप्तमध्ये मध्यस्थी समिती पाठवली आहे. या समितीच्या माध्यमातून हमास आणि इस्रायलचे प्रतिनिधी भेट घेऊन शांतता चर्चेस पुढे नेणार आहेत. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओलिस सुटका आणि कैद्यांची देवाणघेवाण सुनिश्चित करण्यासाठी स्टीव्ह विटकॉफ व जेरेड कुशनर यांना इजिप्तला पाठवले आहे. इजिप्तचे परराष्ट्र मंत्रालय या चर्चेत मध्यस्थी करेल. दरम्यान, गाझामधील ही परिस्थिती नागरिकांसाठी अत्यंत गंभीर आहे. यामुळे जागतिक स्तरावरही सुरक्षिततेच्या चिंतेला चालना मिळाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version