रशियात नागरिकांना महागाईचा फटका

रशियात नागरिकांना महागाईचा फटका

रशियाकडून युक्रेनवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियावर बंदी घातली आहे. रशिया-युकेन युद्धामुळे अनेक उत्पादन महाग होत आहेत. तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया-युक्रेन दोन्ही देशांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. दरम्यान, समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रशियाच्या सुपरमार्केटमध्ये नागरिक साखरेसाठी आपापसात धक्काबुक्की करताना दिसत आहेत.

देशात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीसाठी पुतिन यांना जबाबदरा धरत आहेत. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने सर्व रशियच्या दुकानांमध्ये केवळ १० किलो साखर ठेवण्याची मर्यादा घातली आहे. ज्यामुळे सर्वच भागात लोकांना सहज साखर मिळू शकते. तर, दुसरीकडे रशियात साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियातील वार्षिक चलनवाढ २०१५नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे साखरेच्या दरात सुमारे ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version