Pune ZP Election Result 2026: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची जादू; राष्ट्रवादी अनेक ठिकाणी आघाडीवर

राज्यभरात 7 फेब्रुवारीला  12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
Pune ZP Election Result 2026: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची जादू; राष्ट्रवादी अनेक ठिकाणी आघाडीवर

राज्यभरात 7 फेब्रुवारीला  12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले.  या  निवडणुकांचे निकाल आज, सोमवारी जाहीर होत आहेत. यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात एकूण 66.28 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पुण्यात 68.35  टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील एकूण 1 कोटी 41 लाख 90 हजार 211 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अशातच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 200 जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट- 43 आघाडीवर आहे. तर भाजप- 70, शिवसेना शिंदे गट- 38, काँग्रेस- 21, शिवसेना ठाकरे गट- 6, राष्ट्रवादी शरद पवार गट- 3, इतर- 11 जागांवर आघाडीवर असल्याचा कल हातात आला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version