देशातील डॉक्टरांची प्रमुख संस्था इंडियन मेडिकल असोसिएशननने केंद्र सरकारला सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोना विरोधी लढाईत कुठलीही ढिलाई देऊ नये, असं आवाहन आएमएने केलं आहे. अशा कठीण परिस्थितीत विविध संस्थांचे अधिकारी आणि नागरिकांमध्ये कोरोना रुग्णांबाबत जो हलगर्जीपणा केला जात आहे त्यावरही आयएमएने नाराजी व्यक्त केली आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा आणि राजकीय नेतृत्वाच्या अथक प्रयत्नांनंतर देशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे पुन्हा निष्काळजीपणा दाखवू नये, असा इशारा आयएमएने दिला आहे. आयएमएने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
IMA HQs. Press Release 12.07.2021 pic.twitter.com/ZhmbpezPUD — Indian Medical Association (@IMAIndiaOrg) July 12, 2021
कोरोनाची तिसरी लाट जवळ आली आहे. अशा कठीण स्थितीत विविध संस्थांचे अधिकारी आणि नागरिकांमध्ये कोरोना रुग्णांबाबत जो हलगर्जीपणा केला जात आहे. त्यावरही आयएमएने नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटन आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी आणखी काही महिने आपण थांबू शकतो. पर्यटन आणि धार्मिक स्थळं उघडण्यात आली आहेत. लस न घेता नागरिक मोठ्या प्रमाणावर तिथे गर्दी करत आहेत. हे कोरोनाची तिसरी लाट येण्याचे कारण ठरू शकते, असा गंभीर इशारा आयएमएने पत्रातून दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.