‘मरेन तर भगव्यातच’

‘मरेन तर भगव्यातच’

‘उद्धव ठाकरे मला काही ना काही देतील,त्यांनी मला शब्द दिलाय,नैराश्य आहे पण शिवसेना सोडणार नाही,मरीन तर भगव्यातच’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे औरंगाबाद मधील नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानंतर दिलीय.

उमेदवारी मिळाली नाही म्हणून थोडं नैराश्य जरूर आहे.पण शिवसेना पक्ष कधीच सोडणार नाही. मी त्यांपैकी नाही. असंही खैरे यांनी स्पष्ट केलं. मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने मला राज्यसभेची उमेदवारी मिळावी, अशी शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे माझं पुनर्वसन जरूर करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नवीन लोकांना संधी दिली पाहिजे असंही खैरे म्हणाले. भाजपने भागवत कराड यांना उमेदवारी दिल्याची बाब मला खटकली असंही खैरे यांनी म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version