राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण्याचा मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असल्याचे मिरजमध्ये उघड झाले आहे. संपकारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची पगारवाढ होणार असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेतले. मात्र एक महिना पगारवाढ देऊन पुन्हा मागे घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली आहे.
परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड होत आहे. आंदोलनातून बाहेर पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत रुजू होण्याकरता त्यांना पगारवाढ करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांना पगारसुद्धा देण्यात आली. मात्र, सेवेर रुजू झाल्यानंतर त्यांना पुन्हा मूळ पगारावर कायम आणण्यात आले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.