जात पडताळणीची अट शिथिल करण्याची माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंची मागणी

जात पडताळणीची अट शिथिल करण्याची माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंची मागणी

अमरावती जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजलंय. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला जात पडताळणी प्रमाणपत्र असणे गरजेचे असल्याची अट आहे. या प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांचा धावाधाव सुरु आहे.

इच्छुक उमेदवारांची धावाधाव पाहता, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सरकारकडे एक मागणी केली आहे.

काय म्हणाले अनिल बोंडे ?

त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी इच्छूक उमेदवाराची पायपीट सुरू आहे. त्यामुळे या जात प्रमाणपत्र अट शिथिळ करावी. तसेच प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पावती निवडणूक अर्ज जोडता यावा.

तसेच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर 6 महिन्यात प्रशासनासमोर जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी प्रशासनातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे.

पण असं असातानाही, निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांची जात पडताळणी कार्यालयासमोर प्रमाणपत्र काढण्याकरिता गर्दी होत आहे, असेही बोंडे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version