तुळजाभवानी मंदिरात पाश्चिमात्य कपड्यांवर प्रवेशबंदी

तुळजाभवानी मंदिरात पाश्चिमात्य कपड्यांवर प्रवेशबंदी

तुळजाभवानी मंदिरात कित्येक कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येत असतात. परंतु आता येणाऱ्या भाविकांवर कपडे परिधान करण्याचीही मर्यादा आली आहे. महाराष्ट्राची कलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आता अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय कपडे घालून जाणाऱ्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. हाफ पँट, बरमुडा परिधान केलेल्या भक्तांनाही आता प्रवेश नाकारण्यात येणार आहे. याबाबत मंदिर परिसरात फलक लावून भाविकांना आवाहन आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी भारतीय संस्कृतीचे आणि सभ्यतेचे भान ठेवावे असेही यावर म्हंटले आहे. दरम्यान पुजारी वर्गातून मंदिर संस्थानच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून त्यांनी तहसीलदार सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचे आभार मानलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version