विधानपरिषदेच्या चार जागांसाठी ‘या’ दिवशी मतदान

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान आणि १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या चार जागांसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी ‘या’ दिवशी मतदान

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान आणि १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या चार जागांसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक या चार विधानपरिषदेच्या जागांसाठी ३१ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. उमेदवारी अर्ज ७ जून पर्यंत दाखल करता येईल. उमेदवारी अर्जांची छाननी १० जून रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज १२ जून पर्यंत मागे घेता येईल. मतदान २६ जून रोजी होईल. सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया ५ जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल. 

महाराष्ट्र विधानपरिषद

मुंबई पदवीधर मतदारसंघ – विलास पोतनीस, शिउबाठा – ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ – निरंजन डावखरे, भाजपा – ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे, शिउबाठा – ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार
मुंबई शिक्षक मतदारसंघ – कपिल हरिश्चंद्र पाटील, समाजवादी गणराज्य पक्ष – ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version