Narendra Darade On Nashik MLC Result: "महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा घात केला" नाशिकचा निकाल लागताच दराडेंकडून संताप व्यक्त

नाशिक विधान परिषदेतील निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दरडे यांनी गिरीश महाजनांसह महायुतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Narendra Darade On Nashik MLC Result: "महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा घात केला" नाशिकचा निकाल लागताच दराडेंकडून संताप व्यक्त

राज्यात गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषद निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं उरलेल्या 11 ठिकाणांचे निकाल आज जाहीर होत आहे. दरम्यान नाशिकमधून धक्कादाक निकाल पुढे आला. अपक्ष उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे गोकुळ गीते यांचा नाशिक विधान परिषदेमध्ये विजयी झाले. या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दरडे यांनी गिरीश महाजनांसह महायुतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा विश्वासघात केला असून विशेष म्हणजे, गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंना सर्व ताकद दिली असल्याची खंत दरडेंनी व्यक्त केली. 

हेही वाचा- Gokul Gite Win in Nashik : नाशिकमध्ये गणितं बदलली! भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा एकतर्फी विजय

यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दरडे म्हणाले की, “महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला. आतून त्यांनाच सपोर्ट केला त्यांचा प्रचार करून त्यांनाच ताकद दिली. मी मात्र महायुतीच्या आशेवर राहिलो. परंतु मी कुठे तरी कमी पडलो. त्यांनी मला अंधारात ठेवून पाडलं. महायुतीतील एकनाथ शिंदे यांना सोडून बाकी सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांनी माझ्याबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. आर्थिक स्थितीत प्रबळ असल्यामुळे मी हरलो. गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंना सर्व ताकद दिली. केसाने आमचा गळा कापला.”

नाशिकमध्ये गोकुळ गीते यांचा एकतर्फी विजय  
नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान गोकुळ गीतेंच्या आघाडीने नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील गणिते बदलली आहेत. नाशिक विधान परिषदेच्या रिंगणात अपक्ष उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भुईसपाट केलं आहे. गोकुळ गीतेंनी पहिल्या फेरीत 310 पैकी 389 मतांनी निर्णायक आघाडी घेतली. पहिल्याच फेरीत मिळालेल्या या एकतर्फी मतदानामुळे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version