मुंबई : राज्यात बऱ्याच ठिकाणी एसटी कर्मचारी संप करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एसटी कृती समितीची बैठक बोलावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचे हाल नको असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीत तोडगा निघणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.