Dr. D. Y. Patil Passed Away : माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Dr. D. Y. Patil Passed Away : माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणसम्राट, माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज, मंगळवार 4 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे ते वडील होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून बरी नव्हती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : Balochistan Independence Day : आता बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही ऑगस्ट महिन्यात; पाकिस्तानपासून वेगळं होण्याच्या दाव्यानंतर केली जागतिक मान्यतेची मागणी

डी. वाय. पाटील यांनी राज्यात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. काँग्रेसमध्ये नेते असलेले डी. वाय. पाटील 1957 ते 1962 दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. तर 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. 
त्यांनी 1983 मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RAIT) या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. आज त्यांच्या ‘डी. वाय. पाटील ग्रुप’ अंतर्गत 7 पेखा जास्त अभिमत/खासगी विद्यापीठे आणि 150 पेक्षा अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहारचे राज्यपाल म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version