सोळजाई मंदिराचा वर्धापन दिन दिमाखात संपन्न

सोळजाई मंदिराचा वर्धापन दिन दिमाखात संपन्न

कोकणातील यात्रा या अगदी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातात. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेनंतर देवरूखमधील सोळजाई मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या आनंदात साजरा होत आहे. या वर्धापन दिनासाठी मुंबई-पुणे येथून अनेक कोकणी लोकांनी हजेरी लावली आहे.

देवरुखची ग्रामदेवता असलेल्या श्री सोळजाई देवी मंदिराच्या 5 व्या वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यासाठी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं. 9 तारखेला देवीयज्ञ संपन्न झाला तर आज 10 तारखेला संपूर्ण देवरुख शहरातून चित्र रथांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.

यात 42 वाड्यांमधील सुमारे 15 हजार नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होते. यासाठी देवस्थान समितीकडून उत्तम नियोजन करण्यात आले होते.

यावेळी मोठ्या प्रमाणावर देवरूखमध्ये भाविकांची गर्दी पहायला मिळाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version