मुंबई : हक्काचं सोडायचं नाही, मित्रपक्षांना द्यायचं ते दिलं, असे भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईत घेतलेल्या संकल्प सभेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत खोट्या प्रचाराचा फटका बसला. या प्रचाराला हरविण्यासाठी आणि भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले.
मविआचा प्रचार पुन्हा चालणार नाही. मुंबईत भाजपा खोलवर रुजली आहे. अहंकार टाळा, चमकेशगिरी सोडा; असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर आला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची वक्तव्यं
भाजपाचे विधान परिषदेचे उमेदवार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.