ठाकरे गटाचे प्रवक्ता आनंद दुबेंना जीवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास गोळ्या घालू, अशी धमकी शिंदे गटाचे सचिव संजय माशिलकरांनी दिल्याचा आरोप दुबेंनी केला आहे. या प्रकरणी समतानगर पोलीसांत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात काय चाललंय? या सरकारने कोणती स्थिती निर्माण केली आहे? शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे काल एका टीव्ही वृत्तवाहिनीवर चर्चा करत असताना त्यांना ऑन एअर धमकी देण्यात आली. गृहमंत्री फडणवीस प्रेक्षक बनून बसले आहेत. सरकारने आपल्या राजकीय विरोधकांना मारण्याचे कंत्राट दिले आहे का? फडणवीस उत्तर द्या इथे औरंगजेबाचे सरकार चालू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.