पुणे: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते .पण यंदा कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने हा सण साजरा केला जात आहे.
दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्णांना दिला जातो.कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून रस्त्यावरुनच भाविक बाप्पाचे दर्शन घेत आहेत.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दगडूशेठ गणपतीला १ हजार १११ हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.