TET Paper Leak : भिवंडीत पेपरफुटीचा पर्दाफाश! पुढे ढकलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरावं लागणार? शिक्षणमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

भिवंडीत टीईटीच्या पेपरफुटीचा पर्दाफाश होताच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागणार का? यावर दादाजी भुसे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
TET Paper Leak : भिवंडीत पेपरफुटीचा पर्दाफाश! पुढे ढकलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरावं लागणार? शिक्षणमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर भिवंडी येथे एका त्रिकुटाकडून फोडला गेला. हे वृत्त पसरताच संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. नीट परीक्षा पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली आता टीईटी परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाल्याने या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांचा भ्रमनिरस झाला आहे. शासनाने सर्व परीक्षार्थी शिक्षकांना त्यांचे प्रवेश शुल्क परत द्यावे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा काढून घेऊन विश्वसनीय संस्थेच्या माध्यमातून ही परीक्षा लवकरात लवकर द्यावे अशी मागणी शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केली आहे. यावर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट दिली आहे.

हेही वाचा- Devendra Fadanvis on TET Paper Leak: TET प्रकरणात सरकार अ‍ॅक्शन मोडवर; मुख्यमंत्री फडणवीस यांचे कठोर आदेश, SIT गठित करून चौकशी सुरू

पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरावं लागणार? 
“परीक्षा परिषदेच्या पेपर फुटीनंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही. पुनर नोंदणी करण्याची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. परीक्षा परिषद पुणे आयोजित परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीग झाल्याची माहिती समोर आली. 37 ठिकाणी परीक्षा होणार होती. 1728 परीक्षा केंद्र होते. सहा लाख 125 उमेदवार परीक्षा देणार होते. पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा कधी होणार आहे याचं नियोजन लवकर कळवू. सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही. यामध्ये उमेदवारांचा दोष नाही. पुन्हा रजिस्ट्रेशन फी आकारणार नाही”, अशी माहिती स्वतः शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

हेही वाचा- TET Exam Postponed: TET पेपरफुटी प्रकरणात हरियाणा आणि बिहार कनेक्शन उघड; 1.5 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

तसेच महाराष्ट्रातील 1028 परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेपूर्वीच पेपरफुटीचा संशय निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न नियोजित प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती आहे. पाठीमागच्या काळामध्ये नीट परीक्षेमध्ये जे काही पेपर फुटीचा प्रकरण घडलेलं त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पण काळजी घेतलेली होती. परंतु आज पहाटे ठाणे भिवंडी पोलिसांच्या माध्यमातून काही गोपनीय माहितीच्या आधारावर या ठिकाणी भिवंडीला काही इसमान कडे टीईटीचा पेपर त्या ठिकाणी उपलब्ध आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळाली आणि तात्काळ पोलिसांनी त्या विषयावर कारवाई करत ॲक्शन घेतली आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नसून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version