बंडखोरांना काँग्रेसचा दणका

रविवारी काँग्रेसने सात बंडखोरांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले.
बंडखोरांना काँग्रेसचा दणका

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणून बंडखोरी करणाऱ्यांना काँग्रेसने दणका दिला आहे. रविवारी काँग्रेसने सात बंडखोरांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत काँग्रेसने २८ जणांना बंड केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

रविवारी काँग्रेसने निलंबित केलेले सात जण

  1. सिंदखेडा – शामकांत सनेर
  2. श्रीवर्धन – राजेंद्र ठाकूर
  3. पर्वती – आबा बागुल
  4. शिवाजीनगर – मनिष आनंद
  5. परतूर – सुरेशकुमार जेथलीया आणि कल्याण बोराडे
  6. रामटेक – चंद्रपाल चौकसे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version