काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवारांची घोषणा
महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीद्वारे काँग्रेसने ४८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

मुंबई : महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीद्वारे काँग्रेसने ४८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांना, अमित आणि धीरज यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. डॉ. विश्वजीत कदम यांना पण काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
- अक्कलकुवा (एसटी) – अॅड. के. सी. पाडवी
- शहादा (एसटी) – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
- नंदूरबार (एसटी) – किरण दामोदर तडवी
- नवापूर (एसटी) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक
- साकरी (एसटी) – प्रवीण बापू चौरे
- धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
- रावेर – अॅड. धनंजय शिरिष चौधरी
- मलकापूर – राजेश पंडितराव एकडे
- चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
- रिसोड – अमित सुभाषराव झनक
- धामणगाव रेल्वे – प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप
- अमरावती – डॉ. सुनिल देशमुख
- तिवसा – अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
- अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
- देवळी – रणजीत प्रताप कांबळे
- नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल विनोदराव गुडधे
- नागपूर मध्य – बंटी बाबा शेळके
- नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
- नागपूर उत्तर (एससी) – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
- गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
- राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे
- ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
- चिमुर – सतीश मनोहरराव वारजूकर
- हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
- भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
- नायगाव – मिनल निरंजन पाटील (खतगावकर)
- पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
- फुलंब्री – विलास केशवराव औताडे
- मीरा भायंदर – सय्यद मुझफ्फर हुसैन
- मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
- चांदीवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
- धारावी (एससी) – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
- मुंबादेवी – अमिन अमिराली पटेल
- पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
- भोर – संग्राम अनंतराव थोपटे
- कसबा पेठ – रविंद्र हेमराज धंगेकर
- संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- शिर्डी – श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
- लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
- लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
- अक्कलकोट – सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
- कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
- कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
- करवीर – राहुल पांडुरंग पाटील
- हातकणंगले (एससी) – राजू जयंतराव आवळे
- पलूस काडेगाव – डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
- जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत