Monsoon Session 2026 : सभागृहात ड्रग्जचा मुद्दा पेटला! विरोधक थेट फडणवीसांना भिडले; केली प्रश्नांची सरबत्ती

Monsoon Session 2026 : सभागृहात ड्रग्जचा मुद्दा पेटला! विरोधक थेट फडणवीसांना भिडले; केली प्रश्नांची सरबत्ती

मुंबई : काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील नेस्कोमध्ये सुरू असलेल्या कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या सेवनामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याशिवाय मुंबईत वेळोवेळी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. या गंभीर विषयाची दखल घेत राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले. हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित करून सत्ताधाऱ्यांचे याकडे लक्ष वळवले. यावेळी ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी ड्रग्सबाबत आपण नेहमी या सभागृहात चर्चा करतो. ज्या ज्या ठिकाणी ड्रग्स विकला जातो त्याची माहिती पोलिसांना देतो, तरी कारवाई होत नाही, असा आरोप केला आहे. तसेच आज गल्लीबोळात ड्रग्स विक्री केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी यावेळी म्हटले की, ड्रग्जप्रकरणी अनेकांना अटक केली जाते. पण गुन्हा एक दोघांवर होतो. नार्कोटेस्ट सेल काय करत आहे? ऑनलाईन ड्रग्स सहज मिळते. अनेक ठिकाणी ड्रग्सचे सेवन केले जाते. ज्या पोर्टवर हे ड्रग्स सापडतात तिथे आपले पोलीस पाठवा. तरुणाई या विळख्यात अडकली आहे.  तसेच जितेंद्र आव्हाड यांनीही ड्रग्जचे रॅकेट पोलिसांच्या संगतमताने होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सिनिअर पीआयला घरी बसवल्याशिवाय सुधारणा होणार नाही. माझ्या विभागात सर्वात जास्त ड्रग्ज वापर होतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : Shivsena Eknath Shinde : 6 खासदारानंतर शिंदेंचा आणखी एक मास्टर प्लॅन तयार; ठाकरेंसमोर शिंदेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान

या सर्वांच्या प्रश्नांचा उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज राज्यासमोर महत्वाचे आव्हान उभे राहिले आहे. आपण अँटी नार्कोटेस्टची मोहीम हाती घेतली आहे. पूर्वी आपण एखादी घटना झाली की कारवाया करायचो. पण आता आपण कारवाई तर करतोच पण त्याचा मागचा इतिहास देखील शोधून काढतो. जवळपास वेगवेगळ्या राज्यात जाऊन आपण कारवाई केली. आपण जागृती करण्याबाबत देखील मोहीम हाती घेतली आहे. जे पोलीस यात मिळाले, त्यांना बडतर्फ केले. राज्यात चार महिन्यांत 254 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ही माहिती सरकारने विधानसभेत दिली. तर जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी राज्यात 1,142 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत 1,626 आरोपींना अटक करण्यात आली असून 254.53 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली. अंमली पदार्थ सेवनाविरोधात 3,199 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यभरात ड्रग्जविरोधी कारवाईसाठी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स (ANTF) ची सातही युनिट्स कार्यरत आहेत. 2025 मध्ये ANTF आणि पोलिसांनी मिळून 523.17 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले. ड्रग्ज तस्करी व विक्रीबाबत शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण असून दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईत ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान तसेच नशामुक्ती जनजागृतीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version