Chhatrapati Sambhajinagar AIMIM fraud : एमआयएमला आणखी एक धक्का; तिसरे अपत्य लपवणे पडले चांगलेच महागात

मतीन पटेल प्रकरण ताजं असतानाच आता एमआयएमचे नगरसेवक मेराज खान जलील खान गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar AIMIM fraud : एमआयएमला आणखी एक धक्का; तिसरे अपत्य लपवणे पडले चांगलेच महागात

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मतीन पटेल प्रकरण ताजं असतानाच आता एमआयएमचे नगरसेवक मेराज खान जलील खान गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. मनपा निवडणुकीत दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास अपात्र ठरण्याच्या भीतीने, एमआयएम नगरसेवक मेहराज खान याने चक्क आपल्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा- MIM Matin Patel House: निदा खानला लपवणं पडलं महागात; महापालिकेने मतीन पटेल यांच्या घरावर चालवला बुलडोझर

निवडणूक शपथपत्रात तिसऱ्या अपत्याची माहिती जाणीवपूर्वक लपवणे, खोट्या जन्म प्रमाणपत्र दाखल्यावर बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे आणि खोटी माहिती सादर करून निवडणूक लढवल्याचा आरोप मेराज खान यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मेराज खान यांच्यासह एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली असून आणखी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उर्वरित पाच आरोपींचा देखील शोध सुरू असून आम्ही त्यांना लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती पोलीस उपआयुक्त पंकज अंतुलकर यांनी दिली. दरम्यान नगरसेवक मेहराज खान जलील खान, मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी या दोघांसह निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील खान, इकरा मिनाज खान, सज्जू उस्ताद आणि विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version