भिवंडीत कोसळली धोकादायक इमारत; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी !

भिवंडीत कोसळली धोकादायक इमारत; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी !

भिवंडी शहरातील शांतीनगर पिराणीपाडा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास एक चार मजली धोकादायक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास या इमारतीस तडे पडण्यास सुरवात झाली. याबद्दल स्थानिकांनी याची माहिती महानगरपालिका आपत्कालीन कक्षाला कळवताच आपत्कालीन कक्ष ,अग्निशामक दल जवानांसह शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील कुटुंबियांना घराबाहेर काढत असतानाच मध्यरात्री 01.30 वाजता ही दहा वर्ष जुनी इमारत कोसळली.

या घटनेत आपत्कालीन कक्षातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह सुमारे दहा ते पंधरा जणांवर हा ढिगारा कोसळला.

यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.

मृतांची नावं-

सिराज अहमद अन्वर अली, वय 25 वर्ष

मोहम्मद रफी मोहम्मद हबीब शेख, वय 27 वर्ष

जखमी-

अबुल अजीज सय्यद, वय 65 वर्ष

जावेद कमलूद्दीन शेख, वय 40 वर्ष

निजाम मोहम्मद अली सिद्धीकी, वय 45 वर्ष

त्यामध्ये अजुनही किमान पाच ते सहा नागरीक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

आपत्कालीन आणि पोलीस कर्मचारी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

तुर्तास घटनास्थळी NDRFची टीम पाचारण करण्यात आली असून घटनास्थळी मनपा आयुक्त, तहसीलदार, पोलीस उपायुक्त पोलीस फौजफाटा उपस्थित आहे. ही इमारत फक्त दहा वर्ष जुनी असल्याची आणि ती मुन्नवर अन्सारी या विकासकाने बनवली आहे. ती अनधिकृत इमारत असल्याची माहिती मनपा सुत्रांकडून देण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version