दोन्ही ठाकरेंना काळजी ईदची

दोन्ही ठाकरेंना काळजी ईदची

उद्या ईद आहे. दरम्यान मनसेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही ठाकरेंना ईदीची काळजी असल्याचं दिसून आलं. ‘कोणीही मंगळवारी महाआरती करू नका’ ‘पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या सांगेन’ असं राज ठाकरे ट्विट केलं आहे. तर मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.’ असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. काल राज यांनी औरंगाबादच्या सभेत भोंगे उतरण्यासाठी ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर आज त्यांनी महाआरती न करण्याचं आवाहन केलं आहे.

मुसलमानांच्या रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version