‘उद्धवमामु सत्तेत आले तर मुंबईचं "मोहम्मद लँड" करतील’; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
‘उद्धवमामु सत्तेत आले तर मुंबईचं "मोहम्मद लँड" करतील’; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मुंबई महापालिकेत अनेक वर्ष सत्ता असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप आणि महायुतीचे नेते लक्ष्य करत आहेत. तर उद्धव ठाकरेदेखील मुंबई जर भाजपच्या हातात गेली, तर मराठी माणूस संपेल, अशी भीती व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरेंनी महायुती जर सत्तेत आली तर मुंबईचं परत बॉम्बे करून टाकतील, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाला मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांची प्रत्युत्तर केले आहे. ठाकरेंवर पलटवार करतानाच, उद्धव मामु सत्तेत आले तर मुंबईचं “मोहम्मद लँड” करून टाकतील, असे त्यांनी म्हटले आहे. यासंबंधीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

हेही वाचा : BMC Election: मनपासाठी अपक्ष उमेदवारी, बंडखोरांना भाजपचा दणका, तब्बल 26 जणांवर निलंबनाची कारवाई, वाचा यादी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version