Eknath Shinde – BJP : शिंदेंना शह! माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबतं; रवींद्र फाटक, क्षितीज ठाकूरनंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात?

Eknath Shinde – BJP : शिंदेंना शह! माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबतं; रवींद्र फाटक, क्षितीज ठाकूरनंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई : ठाण्यात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबतं असल्याचे समोर आले आहे. भाजपचे खासदार हेमंत सवरा आणि आमदार राजन नाईक नुकतीच राजीव पाटील यांची भेट घेतली असून ठाणे विधानपरिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यामुळे रविंद्र फाटक, क्षितिज ठाकूरनंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या चर्चेत आला आहे. शिवसेना रविंद्र फाटक व क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असताना भाजप राजीव पाटील यांच्या पाठिशी उभा असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा : Milind Narvekar : फडणवीस आणि ठाकरे गटाचा वाढता समन्वय, नार्वेकरांचा एक फोन आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शिंदे गटाला झटका

आगामी ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपने खलबतं सुरू केली आहेत. पाटील यांच्यासोबत अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या जागेवर शिंदे गटाने आपला दावा केला आहे. तर, स्थानिक भाजप नेत्यांनी त्याला विरोध केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version