नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सध्या सर्वत्र मुंबई महानगपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून सर्वपक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
अशातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी धारकरी कार्यकर्त्यांसाठी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण भाजपकडून एकाच जागेसाठी उमेदवारी देण्याची ऑफर आली यामुळे शिवप्रतिष्ठानमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. याचपार्श्वभूमिवर सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवप्रतिष्ठानच्या धारकरी उमेदवारांनी अपक्ष म्हणून भाजपसमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या घडामोडीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सांगलीकडे लागले आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी कार्यकर्ते हे हिंदुत्ववादी विचारसरणीवर कामे करतात. तसेच सांगलीतही धारकरी कार्यकर्ते लव जिहाद, गोरक्षा, धर्मसंवर्धन यांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक मुद्द्यांवर संघटनात्मक पातळीवर अनेक वर्षांपासून काम करत मात्र तरी देखील त्यांना भाजपकडून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप धारकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा राजकीयवर्तूळात खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.