जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण प्रेमी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. तर ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी सायकल रॅलीतून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करीत सोमवारच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी बुलढाणा शहरातून पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळीच जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन ही रॅली शहराच्या प्रमुख भागात फिरणार आहे. या रॅलीत बुलढाणा शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांसोबत अबालवृद्धांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version