Bhaskar Jadhav : ‘संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांचं दुःख पाहून माझ्या आतड्याला पिळ पडतो’; पक्ष वाढीबाबत विचारले असता भास्कर जाधव स्पष्टचं बोलले

Bhaskar Jadhav : ‘संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांचं दुःख पाहून माझ्या आतड्याला पिळ पडतो’; पक्ष वाढीबाबत विचारले असता भास्कर जाधव स्पष्टचं बोलले

मुंबई : शिवसेना पक्षवाढीबाबत भास्कर जाधव यांना जय महाराष्ट्र चॅनेलच्या एन्काऊंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांना घरचा आहेर दिला. उद्धव ठाकरेंना पक्ष वाढवायचा आहे की नाही, असा सवाल यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, “पक्ष वाढणार कसा. पक्ष वाढण्याकरता काही निर्णय घ्यावे लागतात. मला माझं कौशल्य, कसब, कामाची पद्धत दाखवण्याची संधी काय आहे. काहीच नाही. लोकांचं रडण आणि लोकांचे फक्त हायपाय चोळणं. लोकांनी म्हणायचं आम्ही मरमर मेलो, पण संधी नाही मिळाली. मी एक कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यांची दुःख बघून माझ्या आतड्याला पिळं पडतो. मी ती सगळी जबाबदारी सोडली. उद्धवसाहेबांना विनंती केली. पत्र लिहून दिलं आणि सांगितलं की, मला या सर्व जबाबदारीतून तुम्ही मोकळं करा. अशा पद्धतीनं पक्ष पुढे सरकू शकणार नाही,” असे भास्कर जाधव म्हणाले.   

हेही वाचा : Bhaskar Jadhav : ‘राष्ट्रवादी काँग्रेसनं मला खूप काही दिलं, तो पक्ष मी सोडायला नको होतं’; भास्कर जाधवांची प्रांजळ कबुली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version