Winter Haircare: हिवाळ्याचे आगमन झाले की त्वचेसोबतच सर्वात जास्त परिणाम होतो तो केसांवर. थंड व कोरडी हवा, गरम पाण्याचे आंघोळ, प्रदूषण आणि योग्य आहाराचा अभाव यामुळे केसांत ओलावा कमी होतो. परिणामी केस कोरडे, राठ, तुटके आणि निर्जीव दिसू लागतात. त्यामुळे हिवाळ्यात केसांना विशेष पोषण देणं अत्यंत गरजेचं असतं. अनेकजण हेअर ऑइल वापरतात, परंतु नियमितपणे हेअर मास्क लावल्यास केसांना खोलवर पोषण मिळून ते निरोगी आणि चमकदार राहतात. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात कोणते हेअर मास्क सर्वात फायदेशीर आहेत आणि ते कसे बनवायचे.
1. दही आणि मधाचा डीप कंडिशनिंग मास्क: हिवाळ्यात केसांना सर्वात जास्त गरज असते ती आर्द्रतेची. दही केसांना आर्द्रता देतं, तर मध केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतो.
कसा तयार कराल?
एक वाडगा गच्च दही घ्या, त्यात एक मोठा चमचा मध मिसळा आणि नीट फेटून घ्या.
कसा लावाल?
ओलसर केसांवर मुळापासून ते टोकापर्यंत हा मास्क लावा. 30 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
फायदा: कोरडे आणि राठ केस खूप मऊ आणि गुळगुळीत होतात.
2.अव्होकाडो आणि ऑलिव्ह ऑइल मास्क :अव्होकाडोमध्ये नैसर्गिक फॅटी ऍसिड्स भरपूर असतात, जे केसांना खोलवर पोषण देतात. ऑलिव्ह ऑइल केसांना चमक आणते आणि तुटणे कमी करते.
कसा तयार कराल?
अव्होकाडो मॅश करून त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा.
कसा लावाल?
हा मिश्रण कोरड्या केसांवर लावा. 20–25 मिनिटांनी शॅम्पूने धुवा.
फायदा: केसांना नैसर्गिक चकाकी आणि मऊपणा मिळतो.
3. केळी आणि नारळ तेल मास्क: केळीला नैसर्गिक कंडिशनर म्हणतात. हिवाळ्यात केस फ्रिझी होण्याची समस्या वाढते, आणि हा मास्क त्या समस्येवर उत्तम उपाय ठरतो.
कसा तयार कराल?
एक पिकलेली केळी मॅश करा आणि त्यात एक चमचा नारळ तेल मिसळा.
कसा लावाल?
मिश्रण केसांच्या लांबीवर लावा. 30 मिनिटांनी धुवा.
फायदा: फ्रिझ कमी होतो, केस मऊ होतात.
4.मेथीदाण्याचा प्रोटीन मास्क: मेथीमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. केसगळती, कोंडा आणि कोरडेपणा यावर हा मास्क विशेषतः उपयुक्त आहे.
कसा तयार कराल?
रात्री एक चमचा मेथी भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून त्यात दही किंवा कोरफडीचा जेल मिसळा.
कसा लावाल?
स्कल्पवर चांगला मसाज करा आणि 40–50 मिनिटांनी धुवा.
फायदा: केस मजबूत होतात आणि कोंडा कमी होतो.
5. अंडे आणि बदाम तेल मास्क: अंडी केसांसाठी प्रोटीनचा प्रमुख स्रोत आहे. तुटके, बेजान आणि कमकुवत केसांसाठी हा मास्क अतिशय उपयुक्त.
कसा तयार कराल?
एक अंडं फेटून त्यात एक चमचा बदाम तेल घाला.
कसा लावाल?
स्कल्प आणि केसांवर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा.
फायदा: केसांच्या मुळांना बळकटी मिळते आणि केस चमकदार होतात.
हिवाळ्यात आठवड्यातून किमान एकदा हेअर मास्क लावणे आवश्यक आहे. गरम पाण्याने केस धुणे टाळा आणि शक्यतो सौम्य, सल्फेट-फ्री शॅम्पू वापरा. पुरेसे पाणी प्या आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या. हे सर्व केल्यास तुमचे केस थंडीमध्येही निरोगी, चमकदार आणि मजबूत राहती
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.