एपीएमसी मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणींवर बंदी

एपीएमसी मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणींवर बंदी

एपीएमसी मार्कटेमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या गोणी बाजार समिती आवारात मागवल्यामुळे माथाडी कामगारांनी व्यापारी आणि एपीएमसी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले होते. मात्र आता माथाडी कामगारांच्या आंदोलनाला मोठे यश भेटले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या मालाची गोण असू नये, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

आजपासून एपीएमसी मार्केटमध्ये ५० किलो पेक्षा अधिक वजनाची गोण मागवण्यावर बंदी असून एपीएमसी प्रशासनाने परिपत्रक काढत या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरवात केली आहे.

वाहतूक करण्यात येणाऱ्या मालाचे वजन ५० किलोपेक्षा अधिक नसावे. ही मागणी वारंवार करुनही अधिक वजनाच्या गोणी येत असल्याने माथाडी कामगारांनी जाहीर सभा घेत व्यापाऱ्यांना अंतिम इशारा दिला आहे. शासन निर्णय असतानादेखील जीआर असताना एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांनी काम आंदोलन पुकारले होते. मात्र आता माथाडी कामगारांच्या आंदोलनाला यश आले असून एपीएमसी मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या मालाची गोण असू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version