Thackeray VS Shinde Sena : शिंदे गटाला मोठा धक्का! कोकणात ज्येष्ठ नेत्याची ठाकरे सेनेत वापसी; वैभव नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Thackeray VS Shinde Sena : शिंदे गटाला मोठा धक्का! कोकणात ज्येष्ठ नेत्याची ठाकरे सेनेत वापसी; वैभव नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी आज ठाकरे सेनेत प्रवेश केला. बाळा पावसकर यांनी दोन वर्षांपूर्वी ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश केला. बाळा पावसकर यांची ठाकरे सेनेच्या कुडाळ तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा पक्षप्रवेश शिंदे सेनेला मात्र धक्का मानला जात आहे. 

हेही वाचा : Raj Thackeray : 'तिकडे दोन गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का?'; राज ठाकरेंचा गुजराती – जैन समाजाला थेट इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहा खासदारांनी नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे 2022 ला 40 आमदार आणि आता 6 खासदारांना आपल्याकडे वळवून शिंदे सेनेनी आपली ताकद वाढवली आहे. दरम्यान, याचा उबाठा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी सांगितले. त्यानंतरही ऑपरेशन टायगर 3.0 अंतर्गत आता ठाकरेंचे नगरसेवक वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. परंतू या दरम्यान, शिंदे सेनेला धक्का देत एका शिवसैनिकाने ठाकरे गटात पुनर्वापसी केली आहे. त्यामुळे ठाकरेंची ताकद वाढल्याचे बोलले जात होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version